Publisher's Synopsis
बॉम्बे बुक डेपोला 'मराठी पुस्तकांचे माहेरघर' असे सार्थ बिरूद मिळवून देणारे पांडुरंग नागेश कुमठा म्हणजे ग्रंथविक्री व्यवसायातील सर्वांचे कुमठाशेठ! ग्रंथविक्री व्यवसायाला संपूर्ण आयुष्य वाहिलेल्या कुमठाशेठ यांनी ग्रंथप्रसारासाठी अनेक अभिनव उपक्रम राबवले, जे आजही ग्रंथविक्री व्यवसायात प्रचलीत आहेत. या क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि त्याच्याशी संबंधित आठवणी 'पुस्तक पंढरीचा वारकरी' या पुस्तकातून त्यांनी लिहिल्या आहेत. अतिशय रसाळ, सहजसुदंर भाषेतून लिहिलेले हे अनुभव, या आठवणी म्हणजे ग्रंथविक्री व्यवसायाचा सुमारे पन्नास वर्षांचा इतिहासच!